Maharashtra Weather Forecast : आज विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिला उष्ण रात्रीचा इशारा

Maharashtra Weather Forecast : रविवारी राज्यात वादळी पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे काहीसं ढगाळ हवामान आहे. त्यामुळे राज्याच्या कमाल तापमानामध्ये काही अंशी घट झाल्याचं जाणवत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जेऊर येथे देशातील उच्चांकी म्हणजेच ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद काल (३१ मार्च) झाली. हवामान विभागा ने आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्ण रात्रीचा इशारा दिला आहे. 

रविवारी राज्यात अनेक ठिकाणी जोरदार वारा आणि विजेच्या गडगडासह अवकाळी पाऊस झाला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रामध्ये काल पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहे.

Buldhana News : अज्ञात वाहनाची कारला धडक, डॉक्टर मुलासह आईचा जागीच मृत्यू

देशातील हवामानात वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे बदल पाहायला मिळत आहे. देशात पुढील 24 तासांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पाऊस 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने येण्याची पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात एकीकडे पाऊस पडत आहे, तर दुसरीकडे तापमानात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

आसाम आणि मेघालयमधील काही ठिकाणी पुढील 24 तासांत मुसळधार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये काही ठिकाणी बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आज मध्य प्रदेश, विदर्भ, कर्नाटक आणि तेलंगणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply