Maharashtra Weather Forecast: मुंबईत उन्हाचा चटका वाढतोय; विदर्भात अवकाळीचं संकट कायम

Maharashtra Weather Update Today

राज्यातील हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहे. कोकण आणि मुंबई या भागांमध्ये उकाडा आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आता पुण्यामध्ये देखील ढगाळ वातावरण आहे. राज्यात पुन्हा एकदा तापमान वाढण्यास  सुरुवात होणार आहे. 

राज्यात पुढील चोवीस तासांमध्ये आणखी उकाडा वाढणार आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरसह कोकण किनारपट्टी भागावर थेट परिणाम दिसून येणार  आहेत.समुद्रातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे किनारपट्टी भागात उकाडा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Lok Sabha Election : नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची नाका बंदी; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होतेय तपासणी

विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

दरम्यान राज्यात बुधवारी वाशिममध्ये सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वाशिममध्ये 38.6 अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील 24 तासांमध्ये वाशिममध्ये तापमान स्थिर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता अवकाळी पावसाने थोडीशी उसंत दिली आहे. परंतु आता उकाडा वाढत आहे. परंतु पुढील दोन दिवसांत विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाची आणि गारपीटीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.नागपूर,वर्धा,गोंदिया आणि गडचिरोली भागात अवकाळीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुढील चार दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं राहणार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.काही भागांमध्ये कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

तुरळक पावसाचा अंदाज

हवामान विभागाकडून पश्चिम आसाम हिमालन पश्चिम बंगाल आणि सिक्किममध्ये मुसळधारपावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे आहे. तर ओडिशाचा किनारपट्टी भाग, झारखंड आणि आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टी भागात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हिमालयाच्या पर्वतरागांमध्ये पुढील 2 दिवसांसाठी बर्फवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply