Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर कायम; कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा अवकाळीचा इशारा

Maharashtra Weather : राज्यात एकीकडे निवडणूकीमुळे प्रचाराचं वातावरण तापत आहे. तर दुसरीकडे तापमानाचा पारा वर चढत आहे. विदर्भामध्ये तापमानाचा पारा वाढतीवर आहे. नागपुरमध्ये तापमानाचा पारा 41 अंशाच्या पलीकडे गेला आहे. त्यामुळे नागपूरकरांना उन्हाचे तीव्र चटके सोसावे लागत आहे. 

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात मोठी वाढ झाल्याचं दिसतंय. तापमानाचा पारा 40 अंशाच्या वर पारा गेला आहे. काल (२ एप्रिल) नागपुरमध्ये 41. 2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर पुढील 48 तासांत तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Fire : छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू

दोन दिवसांपासून अवकाळीने देखील मराठवाडा आणि विदर्भामध्ये हजेरी लावली आहे. वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उष्णतेपासून काही अंशी दिलासा मिळत आहे. राज्यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पुन्हाअवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, आणि कोकण विभागात तुरळक पावसाचा अंदाज  वर्तवण्यात आला आहे. पाच एप्रिलपासून हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पाच ते आठ तारखेला मध्य महाराष्ट्रामध्ये, सहा ते आठ तारखेला कोकण गोवा आणि मराठवाड्यात, सात आणि आठ तारखेला विदर्भामध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सतत वाढत्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. एकीकडे वरूण राजा बरसतोय तर दुसरीकडे घामाच्या धारा वाहत आहे. मुंबईतही उकाडा आणि दमट वातावरण वाढलं आहे. मुंबईचे तापमान २ एप्रिल रोजी ३२ डिग्रीवर पोहचले होते. पुणे शहरात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सात आणि आठ तारखेला हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply