Maharashtra Weather : अवकाळीमुळे शेतकरी पुन्हा संकटात, विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये आजही पावसाचा इशारा

Maharashtra Weather : विदर्भातील वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये शनिवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि वादळाने तडाखा दिलाय. शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आजही विदर्भामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. 

राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात अजूनही थंडी कायम आहे. आज विदर्भात वादळी वारं आणि विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे. गारपीट अवकाळीने शेतकऱ्यांना हैराण करून सोडलं आहे. विदर्भातील वर्धा, नांदेड, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि अवकाळी पाऊस, गिरपिटीने शिवारात उभ्या असलेल्या पिकांना जमिनदोस्त केलंय.

Vallabh Benke Death : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचं निधन, पंचक्रोशीवर शोककळा

अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे, धामनगाव रेल्वे आणु अन्य काही तालुक्‍यात गारपीट तसंच पाऊस झाला. वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात देखील गारपीट व पाऊस पडल्याची नोंद आहे. दरम्यान, सोलापूर येथे रविवारी २४ तासांमध्ये राज्यातील उच्चांकी ३६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुणे, सांगली आणि परभणी येथे ३५ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद (Weather Update) झालीय.

यवतमाळ जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून गारपिटीचा कहर सुरू आहे. काल सलग दुसऱ्या दिवशीही बाभुळगाव, आर्णी, महागाव आणि उमरखेड या तालुक्यांना गारांसह अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. हजारो गावातील शेतकऱ्यांचं यात अतोनात नुकसान झालंय.

यवतमाळ, आर्णी, उमरखेड बाभुळगाव या तालुक्यांना सलग दुसर्‍या दिवशीही गारपीटीसह अवकाळी पावसाने (rain) झोडपून काढलं आहे. गहू, हरभरा पिकाला याचा जोरदार फटका बसला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र आहे.

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय. शेतकऱ्याच्या डोकापर्यंत आलेलं पीक अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जमिनदोस्त झालं आहे. त्यामुळं शेतकरी हवालदिल झाले आहेत. महाराष्ट्राला आता पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply