Maharashtra Weather : थंडी पळाली, तापमानात मोठी वाढ; पुण्यासह 'या' आज जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

Maharashtra Weather : वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे देशातील वातावरणात पुन्हा एकदा बदल झाला आहे. थंडीचा प्रभाव कमी झाला असून ढगाळ वातावरण तयार झालं आहे. मागील दोन दिवसांपासून काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, पुढील २४ तासात अशीच परिस्थिती राहणार असून काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, तापमानात घट झाल्याने महाराष्ट्रातील विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाच्या तुरळक सरी कोसळतील. पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर भागात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Breaking News : बंदी असतानाही नायलॉन मांजाची विक्री करणं भोवलं, नाशिकमध्ये ४२ जणांवर तडीपारीची कारवाई

धुळे आणि नंदुरबारमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेशात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होऊ शकतो.

याशिवाय तामिळनाडू आणि केरळमध्ये देखील अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळीमुळे मातीत जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील काढून घ्यावी किंवा झाकून ठेवावी, असा सल्लाही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. नैऋत्य अरबी समुद्रावरील सक्रिय कमी दाबाचे क्षेत्र आणि उत्तर कोकणातून उत्तरेकडे पसरलेल्या बाष्पाचे ढग तयार झाल्यामुळे हवामानावर परिणाम दिसून येत असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply