Maharashtra Weather : मुंबई, ठाणेसह पालघरला येलो अलर्ट; पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता

Maharashtra Weather : राज्यात पुढील 48 तासांत जोरदार  पाहायला मिळणार आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यात आज आणि उद्या अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. पुढील 48 तासांत मुंबई, ठाणे  सह, कोकण  आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. मुंबईत 25 आणि 26 नोव्हेंबरला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई, ठाणेसह पालघरला येलो अलर्ट

आठवड्याच्या शेवटी मुंबईत अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. मुंबईत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पावसानंतर शहरातील हवेच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. 

Jayakwadi Dam : मराठवाड्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी; नाशिकमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास सुरूवात

पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशाच्या हवामानात मोठा बदल झाला आहे. कधी ऊन, कधी पाऊस असं चित्र पाहायला मिळत आहे. नोव्हेंबर महिना जवळजवळ संपत आला असला, तरी थंडीत मात्र वाढलेली नाही. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्चच्या आकडेवारीनुसार, पूर्वेकडील चक्रीवादळ पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत आहे, ज्यामुळे तामिळनाडू किनारपट्टीवर पाऊस पडत आहे. तो लवकरच केरळ आणि आसपासच्या भागात पोहोचेल. त्यानंतर थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply