Maharashtra Weather : राज्यात थंडीचा कडाका वाढणार, अनेक जिल्ह्यांतील तापमानात घट; अवकाळीचं संकट टळणार?

Maharashtra Weather : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी देखील बरसल्या होत्या. मात्र, आता राज्यातील ढगाळ वातावरण निवळलं आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात कडाक्याची थंडी पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यातून मान्सूनने  माघार घेतली होती. त्यामुळे बहुतांश उन्हाच्या तीव्र झळा जाणवत होत्या. उन्हामुळे राज्यातील नागरिक त्रस्त झाले होते. अनेक जिल्ह्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली होती.

Pune Pollution : प्रदुषणाबाबत पुण्यातील परिस्थिती चिंताजनक, मागील अनेक दिवसांपासून हवेची गुणवत्ता खालवलेलीच

मात्र, नोव्हेंबर महिना सुरू होताच तापमानात घट झाली. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं. कोकणासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला.

दरम्यान, हिमालयाच्या कुशीत असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये सुरू झालेल्या बर्फवृष्टीमुळे महाराष्ट्रातदेखील उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे राज्यातील ढगाळ वातावरण निवळलं असून लवकरच थंडी पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या वाढत्या थंडीचा चांगला परिणाम रब्बी हंगामाच्या पिकांवर होणार आहे. गहू, हरबरा पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. चालू असलेल्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात थंडीचा जोर अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply