Maharashtra weather : सावधान! सोसाट्याचा वारा अन् वि‍जांचा कडकडाट, ४ दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Weather Alert: मागील दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे, मुंबई, नाशिक, मराठवाडा, कोकण आणि विदर्भात धो धो पाऊस कोसळत आह. पुढील चार दिवस राज्यात पावसाची अशीच स्थिती राहणार आहे. मुंबई हवामान विभागाने (IMD) राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने स्थानिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

२१ मे रोजी कर्नाटक किनारपट्टीजवळ पूर्व-मध्य अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्याचा परिमाण महाराष्ट्रात होऊ शकतो. कर्नाटक किनारपट्टीजवळ तयार होणाऱ्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Pune Rain : पुण्याला पावसाने झोडपले, नाले तुंबले, रस्ते पाण्याखाली, एका मुलाचा मृत्यू

आयएमडीच्या हवामान अंदाजानुसार, २२ मेपासून कर्नाटक किनारपट्टीवरून हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. २५ मेपर्यंत ते आणखी तीव्र होऊन महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढवेल. गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात मॉन्सूनपूर्व मध्यम सरी आणि मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. आयएमडीने यंदा मॉन्सून लवकर येण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील पाच ते सहा दिवसांत केरळमध्ये मान्सून धडकण्याची शक्यत आहे. तर १० तारखेला मान्सून महाराष्ट्र व्यापणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून तळ कोकणात धडकण्याची शक्यता आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील ४८ तास मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईतील कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहू शकते. मंबईत आकाश सामान्यतः ढगाळ राहील, आणि मध्यम ते मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply