Maharashtra Weather : महाराष्ट्रात थंडीचा जोर ओसरला! तापमानात चढ-उतार होणार, अनेक ठिकाणी धुक्याची चादर

Maharashtra Weather : राज्यात थंडी हळूहळू ओसरताना दिसत आहे. डिसेंबर महिन्यात खूप प्रमाणात थंडी होती. रविवारी राज्याचे निचांकी तापमान हे ९ अंश सेल्सियस नोंदवले गेले होते. आजही तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. आज राज्यात ढगाळ हवामानदेखील असू शकते

पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र आहे. त्यामुळे उद्यापर्यंत हे वारे उत्तर तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढत आहे. पंजाबमध्ये देशातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. पंजाबच्या लुधियाना येथे ५.६ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे.

उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे राज्यातदेखील तापमान वाढले आहे. धुळ्यात फक्त १० अंश सेल्सियपेक्षा कमी तापमान आहे. बाकी सर्व राज्यांमध्ये किमान तापमान १० अंशाच्या वर आहे. आज सकाळी राज्यात थंडीसोबत अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरली आहे.

Maharashtra Politics : सरकारचं खातेवाटप जाहीर; मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं तर अजित पवारांकडे अर्थखातं

 

राज्यातील तापमान 

राज्यात आज थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. पुण्यात किमान तापमान १५.२ अंश आहे. तर कमाल तापमान ३१.४ अंश आहे. अहिल्यानगरमध्ये ३० अंश तापमान आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान २९.३ अंश आहे तर किमान तापमान १४.०० अंश आहे. निफाडमध्ये कमाल तापमान २७.७ टक्के आहे. तर किमान तापमान ११.६ टक्के आहे.

धुळ्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. धुळ्यात किमान तापमान ९ अंश आहे तर कमाल तापमान २९.५ अंश आहे.महाबळेश्वरमध्ये किमान तापमान १४.२ टक्के आहे तर कमाल तापमान २४.६ टक्के आहे. सांगलीमध्ये किमान तापमान १६.९ अंश आहे. कमाल तापमान २९.७ टक्के आहे.रत्नागिरीत कमाल तापमान ३० टक्के आहे तर किमान तापमान १९.७ टक्के आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply