Maharashtra Rain Updates : पुण्यासह, पालघर अन् साताऱ्याला पाऊस झोडपणार, IMD कडून रेड अलर्ट; वाचा कुठं काय परिस्थिती

Maharashtra Rain Updates : गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस महाराष्ट्रातील विविध भागांना झोडपत आहे. आणि पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच राहणार असल्याचे हवामान विभागने सांगितले आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने 4 ऑगस्ट रोजी २ पुणे, पालघर आणि सातारा जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. याशिवाय ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिकसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Vashi Toll Naka : नवी मुंबईत टोलनाक्यावर राडा, चार प्रवाशांचा टोल न भरता जाण्याचा प्रयत्न; पुढे काय घडलं?

IMD नुसार, पालघरमध्ये निर्जन ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे आणि सातारा येथे घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार आणि मैदानी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे

दरम्यान पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे पुणे आणि पिपंरी चिंचवड शहरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी खबरदारी म्हणून

पिंपरी चिंचवड शहरात एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. T अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पूर बाधित नागरिकांचा निवारा केंद्रात स्थलांतरीत करण्यात येत आहे. नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने नदी काठच्या नागरिकांनी सतर्क रहावे. आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या नियंत्रण कक्षाशी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पूर बाधित नागरिकांना महापालिकेच्या वतीने सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात येत आहे. नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने नदी काठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले आहे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply