Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादी जाहीर झाल्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवारी न मिळाल्यामुळे इच्छुक उमेदवार नाराज झाले आहेत. हे उमेदवार बंडखोरीच्या तयारीमध्ये आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारी यादीनंतर अनेक जण नाराज झाले आहेत. मुंबई, नांदेडनंतर आता पुण्यात ठाकरे गटामध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. इच्छुक उमेदवार बंडखोरीच्या तयारीमध्ये आहेत. घाटकोपर पश्चिम विधानसभेत ठाकरे गटात बंडखोरी होणार आहे. इमरान शेख विधानसभा निवडणूक अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र माजी नगरसेवक संजय भालेराव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा समन्वयक इमरान शेख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इमरान शेख यांच्या कार्यकर्त्यांनी इमरान शेख यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

NCP Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा नाहीच

यावेळी इमरान शेख यांनी नाराजी व्यक्त करत आपण ही निवडणूक लढणार असल्याचा निर्धार केला. आपण ही निवडणूक अपक्ष लढणार असल्याचे इमरान शेख यांनी सांगितले. घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे मतांचे यामुळे विभाजन होण्याची शक्यता आहे. याकरिता इमरान यांना उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवर भेटण्यासाठी बोलविले आहे. आता ते नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर दुसरीकडे, जागावाटपावरून ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. नांदेड, पुण्यातील जागावाटपावरून पदाधिकारी नाराज आहेत. नांदेड जिल्ह्यातील ९ जागांपैकी एकही जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आली नाही. वाटाघाटीत सर्व जागांवर काँग्रेसचं वर्चस्व आहे. त्यामुळे नांदेडमधल्या स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. अनेक पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहे.

तसंच अहमदनगर जिल्ह्यातही ठाकरे गटाला डावलण्यात आल्याची नेत्यांमध्ये भावना आहे. तर पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुटल्या आहेत. त्या बदल्यात ठाकरेंच्या शिवसेनेला खेड आळंदी जागा सोडण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply