Maharashtra Politics : मराठा ओबीसी वाद मिटणार? आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, शरद पवारांसह दोन्ही ठाकरेंना निमंत्रण

Maharashtra Politics : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. आज याच पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आहे. या बैठकीकडे आज सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मराठा ओबीसी वाद मिटणार का? आरक्षण नेमकं कुणाला मिळणार? असे अनेक प्रश्न या बैठकीनंतर सुटण्याची शक्यता आहे.

आरक्षणाविषयी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक संध्याकाळी सहा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ, मंत्री अतुल सावे, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन, शरद पवार, अशोक चव्हाण, विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभा विजय विजय , सुनील तटकरे, छत्रपती संभाजी महाराज भोसले, बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतेय.

N K Patil : मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालवणं भोवलं, तळेगावचे सीईओ पाटील निलंबित

मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात या महिन्यात महत्वाची सुनावणी आहे. यामध्ये राज्य सरकारकडे सगेसोयरे अध्यादेशाच्या विरोधात आणि बाजूने आतापर्यंत एकूण आठ लाख हरकती आल्यात. याच पार्श्वभूमीवर काल सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु मुसळधार पावसामुळे ही बैठक पुढे ढककली गेल्यामुळे आज बैठक होणार आहे.

या सर्वपक्षीय बैठकीला सरकारने राज ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकरांसह प्रमुख नेते मंडळींना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिलंय. आज सायंकाळी ही बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित केलेली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी तर ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके आक्रमक झाल्याचं सध्या चित्र आहे. त्यामुळेच सुप्रिम कोर्टातील सुनावणीआधी ही बैठक पार पडणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply