Maharashtra Politics News : शिवसेना भवन आणि पक्षनिधी ठाकरेंकडेच राहणार! वकिल आशिष गिरी यांची याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली

Supreme Court On Shivsena Bhavan And Party Fund : राज्याच्या सत्तासंघर्षावरील निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तत्पुर्वी काही दिवसांपुर्वीच शिवसेना भवन आणि पक्षनिधी एकनाथ शिंदेंना देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

या याचिकेबाबतची मोठी बातमी समोर आली असून सुप्रिम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, काही महिन्यांपूर्वी ‘शिवसेना’ पक्ष नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला होता. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेना मुख्यनेते बनले आहेत. त्यामुळे शिवसेना भवन आणि पक्षनिधी एकनाथ शिंदेंना देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात होती. ती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.

काय म्हणाले सुप्रिम कोर्ट...

शिवसेना पक्षाच्या मालमत्ते बाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. उद्धव ठाकरे गटाला पक्षाची संपत्ती द्यायची की नाही याबाबत ही सुनावणी होती. यावेळी संपत्ती शिंदेंना द्यावी अशी मागणी करणारे तुम्ही कोण? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या वकिलाला केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने शिंदे यांची याचिका फेटाळून लावल्याने शिवसेना भवन, शिवसेनेच्या शाखांचा ताबा ठाकरे गटाकडेच राहणार आहे. तसेच शिवसेनेचा निधीही ठाकरे गटाकडेच राहणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply