Maharashtra Politics : अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं

AJit Pawar Maharashtra Politics : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ नेत्यांनी शिंदे-भाजप सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेऊन राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच राष्ट्र्वादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकारपरिषद घेत या भूमिकेला पक्षाचा कोणताही पाठिंबा नसल्याचं जाहीर केलं. अजित पवारांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली.

दरम्यान,अजित पवार यांच्यासह ९ आमदारांवर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपात्रतेची कारवाई करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहलं असून त्यांच्यासोबत फोनवरून चर्चा देखील केली.

त्यामुळे आता अजित पवार यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे ९ मंत्री अपात्र ठरणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, याबाबत विधानसभा अध्यक्षांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी यावर स्पष्टपणे उत्तर दिलं आहे.

Shrikant Shinde : कोरोना बॉडीबॅग ठाण्यात ३५० रुपयांना मिळत असताना मुंबईत ६७०० रुपयांना, खासदार श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल

काय म्हणाले राहुल नार्वेकर?

राहुल नार्वेकर म्हणाले, महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या नऊ आमदारांविरूद्ध अपात्रतेची याचिका सादर केली आहे, ती मी वाचून घेईल आणि त्यात नमूद केलेल्या मुद्द्यांचा अभ्यास करून योग्य निर्णय घेण्यात येईल.

जयंत पाटील यांची याचिका प्राप्त झाली आहे आणि त्यांचं म्हणणं तपासल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल. याचिका वाचल्याशिवाय मी काही सांगू शकणार नाही असेही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply