Maharashtra Politics : मोठी बातमी! शिंदेंनी भाजपच्या दोन्ही ऑपर धुडकावल्या, नवी मागणी केली

Maharashtra Politics News Today : मुख्यमंत्री आणि मंत्रीपदावरुन महायुतीमध्ये पेच निर्माण झालाय. विधानसभा निवडणुकीत महायुतीला न भुतो न भविष्य असं यश मिळाले. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मंत्रि‍पदाची चर्चा सुरु झाली. मुख्यमंत्रिपद भाजपलाच हवेय. त्याशिवाय शिवसेनेकडूनही मागणी करण्यात आली. पण भाजप मुख्यमंत्रीपदासाठी ठाम आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंना दोन ऑफर दिल्या होत्या. या दोन्ही ऑफर एकनाथ शिंदे यांनी धुडकावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्रीपदाऐवजी शिंदेंना केंद्रात मंत्रिपद आणि राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर भाजपकडून देण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी या दोनही ऑफर धुडकावल्या आहेत. उपमुख्यमंत्रीपद आणि केंद्रातील मंत्रिपद एकनाथ शिंदे स्वत: घेणार नाहीत, असे समजतेय.

मुख्यमंत्रीपद मिळाले नाही, तर एकनाथ शिंदे राज्य मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहणार नाहीत. त्यांनी भाजपला तसा मेसेज दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकनाथ शिंदे फक्त पक्षप्रमुख म्हणून काम पाहणार असल्याचे समोर आलेय. त्याशिवाय राज्यात उपमुख्यमंत्रीपदासाठी दोन नावं महायुतीला देणार आहेत.

Panvel News : इंजीनियरिंगची फी भरण्यासाठी चोरी; शटर तोडून युवकाने चोरले ५४ मोबाईल

एकनाथ शिंदे पक्षप्रमुखाच्या भूमिकेत काम पाहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी २ जणांची नावे देणार आहेत, त्यामध्ये मागासवर्गीय किंवा मराठा चेहरा असू शकतो, असेही सांगण्यात आलेय.

मुख्यमंत्री नाही तर गृहमंत्रालयासाठी आग्रही

मुख्यमंत्रीपद सोडण्यास भाजप तयार नाही. त्यामुळे शिवसेनेकडून गृहमंत्रालयाची मागणी करण्यात आली आहे. त्याशिवाय चांगल्या खात्याचीही शिंदे गटाकडून मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री न मिळाल्यास गृहमंत्रालय मिळणार का? याची चर्चा सुरु झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप ४ महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवणार. गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल खाते भाजप स्वत:कडे ठेवणार असल्याचे समजतेय. अर्थ खाते सध्या अजित पवार यांच्याकडे आहे, तर नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply