Maharashtra Politics : ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंनी दिला भिवंडीत झटका; माजी आमदारासह असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. भिवंडीमध्ये ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. माजी आमदारासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भिवंडीमध्ये निवडणुकीदरम्यान ठाकरे गटासाठी हा मोठा फटका असल्याचे म्हटले जात आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भिवंडी पूर्वचे माजी आमदार आणि संपर्कप्रमुख रुपेश म्हात्रे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटामध्ये प्रवेश केला. रुपेश म्हात्रे यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उबाठा गटाने उमेदवारी नाकारल्याने रुपेश म्हात्रे नाराज झाले होते. याबाबतची नाराजी त्यांनी जाहिरपणे बोलून दाखवली होती. अखेर त्यांनी शुक्रवारी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत हाती भगवा झेंडा घेऊन एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

Train Accident : पश्चिम बंगालमध्ये रेल्वे अपघात, एक्सप्रेसचे ४ डब्बे घसरले, अनेकजण जखमी

भिवंडी पूर्वमधून ते सतत दोन वेळा शिवसेनेतून निवडून आले होते. भिवंडी पूर्वमधून २००९ मध्ये आबू आझमी हे दोन ठिकाणाहून निवडून आले होते. त्यामुळे त्यांनी भिवंडी पूर्व विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. तेव्हा २०१० ला भिवंडी पूर्वची पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी रुपेश म्हात्रे हे पहिल्यांदा निवडून आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये देखील ते निवडून आले होते.

तर २०१९ ला त्यांना हार पत्करावी लागली होती आणि याच मतदारसंघातून रईस शेख हे निवडून आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे हे शिवसेना सोडून गेले तेव्हा त्यांनी ठाणे जिल्ह्याची धुरा सांभाळली होती. ठाणे जिल्ह्यात त्यांनी उद्धव ठाकरे गटाची धुरा सांभाळत शिवसेनेची गळती थांबवली होती आणि ठाणे ग्रामीणमध्ये नंबर एकचा पक्ष म्हणून उभारी मिळवली होती. रूपेश म्हात्रे यांनी पक्षाला रामराम ठोकल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply