Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीदरम्यान मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते भाजपच्या गळाला लागले आहेत. मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. रवी राजा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

सायन कोळीवाडा विधानसभा मतदारंसघातून निवडणूक लढवण्यासाठी रवी राजा हे इच्छुक होते. पण ऐन वेळी काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिली त्यामुळे रवी राजा नाराज होते. त्यामुळे रवी राजा यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. रवी राजा यांनी साथ सोडल्यामुळे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. रवी राजा हे मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे मोठे नेते होते. त्यांनी अनेक आंदोलन केली आणि ही आंदोलनं चर्चेत राहिली.

Pune : दिवाळीत अग्निशमन दलाकडून जनजागृती मोहिम; सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

गणेश यादव यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या रवी राजा यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला.सायन कोळीवाडा मतदारसंघांमध्ये काँग्रेसकडून ३ जण इच्छुक होते. यामध्ये रवी राजा, काँग्रेसचे मुंबई सचिव अमित शेट्टी आणि काँग्रेसचे सचिव गणेश यादव यांचा समावेश होता. रवी राजा यांना उमेदवारी मिळेल अशी आशा होती. पण काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिली.

गणेश यादव यांना उमेदवारी दिल्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर होता. रवी राजा आणि अमित शेट्टी यांनी आपली नाराजी पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखवली होती. पण त्यांना पक्षश्रेष्ठींकडून यासंदर्भात काहीच प्रतिसाद मिळाली नाही. त्यामुळे नाराज रवी राजा यांनी काँग्रेसची साथ सोडली. रवी राजा यांच्यानंतर नाराज अमित शेट्टी देखील पक्षाची साथ सोडू शकतात अशी चर्चा सुरू आहे. कारण त्यांनी देखील खासदार वर्षा गाकवाड यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply