Maharashtra Politics : खबरदार! गटबाजी कराल तर खैर नाही, पक्ष सोडणाऱ्यांनाही नो एन्ट्री, काँग्रेस हायकमांडचा महाराष्ट्रातील नेत्यांना गर्भित इशारा; 

 

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकांनंतर मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याबाबत काँग्रेसमधील काही नेत्यांनी थेट दिल्ली दरबारी तक्रार केली आहे. यावरुनच काँग्रेस हायकमांड आणि खासदार राहुल गांधी यांनी थेट इशारा दिला आहे. तसेच पक्ष सोडणाऱ्यांनाही पुन्हा न घेण्याचे आदेश दिले आहेत.

लोकसभा निवडणुकांनंतर मुंबई काँग्रेसमधील खदखद समोर आली असून वर्षा गायकवाड यांच्याबाबत दिल्ली हायकमांडकडे नाराजी व्यक्त करण्यात आल्याचं सागंण्यात येत आहे. याबाबत बोलताना खासदार राहुल गांधी यांनी कोणी ऐकत नसेल तर शिकार करा आणि भिंतीवरती टांगा असे म्हणत गटबाजी करणाऱ्यांना थेट इशाराच दिला आहे.

Maharashtra Politics : मोठी बातमी! राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी सरकारकडून हालचाली

काय म्हणाले राहुल गांधी?

कोणी पक्षविरोधी भूमिका घेत असेल तर पक्ष काय कारवाई करणार असा मुद्दा एका नेत्याने मांडला होता. याबाबत बोलताना राहुल गांधी यांनी शिका-याची गोष्ट सांगत थेट इशारा दिला आहे. जर कोणी ऐकत नसेल तर शिकार करा आणि भिंतीवरती टांगा असे राहुल गांधी म्हणालेत. तसेच मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रभारी रमेश चन्नीथला यांना ४ जूलैला मुंबईत जाऊन हा वाद मिटवण्याचे आदेशही दिले आहेत.

पक्ष सोडणाऱ्यांनाही नो एन्ट्री!

दरम्यान, काँग्रेस पक्ष सोडणाऱ्यांनाही दिल्ली हायकमांडने मोठा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात पक्ष सोडून गेलेल्या नेत्याला पुन्हा पक्षात प्रवेश देऊ नका असा आदेश राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी नाना पटोले यांना दिले आहेत.

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply