Maharashtra Politics : आमदार रोहित पवार यांना पक्षात मिळणार मोठी जबाबदारी? पडद्यामागे हालचाली सुरू

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. आमदार रोहित पवार यांना मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर दिवंगत नेते आर.आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनाही नवी जबाबदारी मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
 
आमदार रोहित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली होती. निवडणुकीआधी त्यांनी महाराष्ट्रात संवाद यात्रा आणि संघर्ष यात्राही काढली होती. बारामतीत रोहित पवार यांनी सुप्रिया सुळे यांचा जंगी प्रचार करून अजित पवार यांना मोठे आव्हान देखील दिले होते.

दरम्यान, शरद पवार यांच्या पाठोपाठ रोहित पवार यांनी केलेल्या जंगी प्रचारामुळे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे १० पैकी ८ जागांवर उमेदवार निवडून आले. मात्र, या निकालानंतर अचानक रोहित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील संघर्ष उघडपणे दिसून आला. या घटनेनंतर आता रोहित पवार यांना महत्वाचं पद देऊन त्यांची नाराजी दूर केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

त्यांच्यासोबत रोहित पाटील यांनाही नवी जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे जयंत पाटील यांच्याकडे विधानसभा निवडणूक संपेपर्यंत पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद कायम राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे रोहित पवार यांना आता कोणती नवी जबाबदारी दिली जाणार? याकडेच सर्वाचं लक्ष लागून आहे.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply