Maharashtra Politics : कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपला मोठा दिलासा; मनसेची निवडणुकीतून माघार

Maharashtra Politics :  कोकण पदवीधर मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपला मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार जाहीर केल्यानंतर कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेतली आहे. या जागेवर मनसेने अभिजीत पानसे यांना उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. परंतु आता या अभिजीत पानसे कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याची माहिती मिळत आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघातून आता भाजप उमेदवार वसंत डावखरेनिवडणूक लढवणार आहेत. परंतु राज ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्यानंतर कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार का घेतली, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. कोकण पदवीधर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदारसंघात उमेदवार घोषित करून राज ठाकरेंना मोठा धक्का दिला होता. परंतु आता मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेतल्याने चर्चांना उधाण आलं  आहे.

Nagpur News : रेल्वे स्टेशनवरुन दाम्पत्याचं 6 महिन्यांचं बाळ चाेरलं, नागपूर पाेलिसांकडून एकास तेलंगणात अटक

आता विधानसभेचं बिगुल वाजण्याआधी जागांवरून मोठी रस्सीखेच सुरू झाल्याचं समोर आलं होतं. लोकसभेनंतर आता राज्यात विधान परिषदेची रणधुमाळी सुरू झाली आहेत. राज ठाकरेंनी लोकसभेत मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता, तर कोकण पदवीधर मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. परंतु मनसेने आता अचानक माघार घेतली आहे.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply