Maharashtra Politics : नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा, देवेंद्र फडणवीसांचे प्रयत्न; 'सामना'मधून खळबळजनक दावा

Maharashtra Politics :  'नरेंद्र मोदी व अमित शहा यांची राजवट ४ जूननंतर संपत आहे. या दोघांना दुर करण्यासाठीच देशातील जनतेने मतदान केले, इंडिया आघाडीला बहुमत मिळेल असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार सामनाचे संपादक संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच सामनामधील रोखठोक मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत राजकारणाबाबत सर्वात खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

काय आहे संजय राऊतांचा दावा?

4 जूननंतर भारतीय जनता पक्षामध्ये नरेंद्र मोदी- अमित शहांना पाठिंबा राहणार नाही. नागपुरमध्ये नितीन गडकरी यांचा पराभव व्हावा यासाठी नरेंद्र मोदी अमित शहा तसेच देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केले. असा सर्वात मोठा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. तसेच गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले, असेही संजय राऊत म्हणालेत.

Heat Stroke Death : छत्रपती संभाजीनगरमध्ये २४ तासांत उष्माघाताचा दुसरा बळी; १७ वर्षीय तरुणीचा झोपेतच मृत्यू

योगी आदित्यनाथांना घरी पाठवले जाईल..

त्याचबरोबर योगी आदित्यनाथ यांच्याबद्दलही मोठा दावा करण्यात आला आहे. जे गडकरींचे तेच योगींचे. मित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे 'योगी को बचाना है, तो मोदी को जाना है' हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला. त्याचा परिणाम ४ जूनला दिसेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

त्यामुळे या प्रकरणी सहकार विभागामार्फत चाचणी लेखा परीक्षण करण्यात यावे. आणि सबधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाकडून करण्यात येत आहे. याबाबतीत आम्ही सहकार आयुक्त पुणे आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करणार असल्याचेही स्वतंत्र भारत पक्षाकडून सांगण्यात येत आहे.

 
 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply