Maharashtra Politics : महायुतीचं घोडं २ जागांवर अडलं; ठाणे आणि नाशिक लोकसभा जागेवरून रस्सीखेच सुरूच

Maharashtra Politics : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. अजूनही महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नसल्याचं समोर येतंय. महायुतीच्या ४८ पैकी ४६ जागा निश्चित झाल्या आहेत. परंतु दोन जागांमुळे अजून जागावाटपाचा तिढा कायम आहे. ठाणे आणि नाशिक लोकसभा जागेवरून अजुनही रस्सीखेच सुरूच आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी भाजप आग्रही आहे. कारण त्याठिकाणी भाजपची ताकद जास्त आहे. परंतु एकनाथ शिंदे ठाणे मतदारसंघ यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ती जागा एकनाथ शिंदेसाठी अतिशय प्रतिष्ठेची असल्यामुळे शिंदे सेना ठाणे मतदारसंघ सोडण्यास तयार नसल्याचं दिसतंय.

Pune Temperature News : धूलिवंदनाला उच्चांकी तापमान ; पाऱ्याची सरासरी २.७ अंश सेल्सिअसने उसळी

सध्या तेथे राजन विचारे हे खासदार असून ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहेत. ठाण्यात भाजपचे 4 आणि शिवसेनेचे 2 आमदार आहेत. यात स्वतः मुख्यमंत्री यांचा मतदार संघ देखील आहे. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमध्ये अजूनही निर्णय झालेला नाही. या ठिकाणी जागावाटपाचा तिढा कायम आहे.

तर दुसरीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा तिन्ही पक्ष स्वतः कडे खेचण्याच्या तयारीत आहेत. नाशिकमध्ये विद्यमान स्थितीत हेमंत गोडसे हे शिंदे गटाचे खासदार  आहेत. मात्र, नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ दावा करत आहेत. यासंदर्भात त्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली होती. याच मुद्द्यावरून काल रात्री (२५ मार्च) नाशिकमधील शिंदे सेनेचे सर्व आमदार, पदाधिकारी आणि स्वतः हेमंत गोडसे हे ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या मांडून बसले होते.

नाशिक लोकसभा जागेवर भाजपकडून दावा केला जात आहे. कारण नाशिक मतदारसंघात भाजपचे तीन आमदार आहेत. त्यामुळे भाजप आपली पूर्ण ताकद वापरून ही जागा आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करत  आहे.

नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे दोन तर काँग्रेसचा एक आमदार आहे. नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद कमी असल्याचं दिसतंय. याच मुद्द्यावरून ही जागा राष्ट्रवादी आणि भाजप स्वतः कडे घेण्याच्या तयारीत आहे. महायुतीच्या जागावाटपाचा घोळ अजून मिटलेला नाही. नाशिकच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप दोघेही आग्रही असल्याचं दिसतंय. परंतु शिंदे सेनेची मात्र कोंडी होत असल्याचं चित्र आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply