Maharashtra Politics : 'माझा हातोडा पुण्यात चालणारच', लोकसभा निवडणूक लढण्यावर वसंत मोरे ठाम

Maharashtra Politics : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी ३ दिवसांपूर्वी राज ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतर वसंत मोरे यांनी अद्याप आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी वसंत मोरे इच्छूक आहेत. मात्र ते कोणत्या पक्षात जाणार याबाबत अजून काही स्पष्टता नाही. वसंत मोरे यांच्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सध्या सुरु आहेत. 

वंसत मोरे काल (१४ मार्च) शरद पवार गटाच्या पुण्यातील कार्यलयात गेले होते. तेथे त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी अमोल कोल्हे हे देखील उपस्थित होते. त्यामुळे वसंत मोरे शरद पवार गटात सामील होतील, अशी चर्चा काल दिवसभर होती. 

Nilesh Lanke : दादा असा विचार करणार नाहीत; अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर निलेश लंके यांचं उत्तर

त्यानंतर वसंत मोरे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. भेट राजकीय नसून, लवकरच भूमिका जाहीर करेल, असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. या भेटीनंतर बोलताना वसंत मोरे यांनी म्हटलं की, मी माझी भूमिका महाविकास आघाडीतील नेत्यांपुढे मांडत आहे. सर्वांसोबत सकारात्मक चर्चा सुरु आहे.

मी पुणेकरांसाठी आणि त्यांच्या हितासाठी लढतोय. माझा हातोडा पुण्यात चालणारच. मी खासदारकीबाबत माझा निर्णयावर ठाम आहे. अशी प्रतिक्रिया वसंत मोरेंनी 'साम टीव्ही'शी बोलताना दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply