Maharashtra Politics : शरद पवारांना राष्ट्रवादी नाव अन् पक्षचिन्ह परत मिळणार? सुप्रीम कोर्टात आज काय होणार?

Maharashtra Politics : अजित पवारांसह जवळपास ४० आमदारांनी राष्ट्रवादीतून बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचाच असा दावा, अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात करण्यात आला. यावर सुनावणी घेताना राष्ट्रवादी नाव अन् पक्षचिन्ह हे अजित पवार गटाचेच आहे, असा निकाल निवडणूक आयोगाने दिला.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के.व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार असून यावर कोर्ट काय निर्णय घेतं? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. 

Pune News : धक्कादायक! वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

शरद पवार गटाने याचिकेत काय म्हटलंय?

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची शरद पवार यांची मागणी करण्यात आली आहे. याबाबतची सुनावणी लवकरात लवकर घ्यावी, अशी विनंती देखील करण्यात आली आहे.

अजित पवार गटाकडून कोर्टात कॅव्हेट दाखल

दुसरीकडे निवडणूक आयोगाने आपल्या बाजून निर्णय दिल्यानंतर शरद पवार गट सुप्रीम कोर्टात धाव घेईल आणि यावर तातडीने सुनावणी होऊ शकते, ही शक्यता लक्षात घेत अजित पवार गटाने   सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केली आहे.

शरद पवार गटाच्या याचिकेवर सुनावणी घेण्याआधी तसेच यावर निकाल देण्याआधी आमचं म्हणणं ऐकून घ्यावं, असं अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या कॅव्हेटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आज यावर काय निर्णय होणार? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply