Maharashtra Politics : अखेर ठरलं! राज्यात भाजप लोकसभेच्या 32 जागा लढवणार? शिंदे अन् अजित पवार गटाला मिळणार 'इतक्या' जागा

Maharashtra Politics : आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू करण्यात आली आहे.राज्यात आणि देशात आगामी लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीतील पक्ष एकत्रित लढणार असल्याच्या तयारीत आहे. त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामाना आगामी निवडणुकांमध्ये दिसण्याची शक्यता आहे. यादरम्या भाजप राज्यात 32 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

यासाठी सत्ताधारी 'एनडीए' आणि विरोधकांची 'इंडिया आघाडी' या दोन्हीमध्ये सहभागी असलेल्या पक्षांमध्ये जागावटपावर चर्चा देखील सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडले आहेत. यामुळे या दोन्ही पक्षांची ताकद कमी झाल्याचे बोलले जात आहे. यादरम्यान याचा थेट फायदा काँग्रेस आणि भाजप हे दोन मोठे पक्षांना होण्याची शक्यता आहे. यादरम्यान महाराष्ट्रात भाजप लोकसभेच्या 32 जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Davos Economic Forum 2024 : 'दावोस दौऱ्यात महाराष्ट्राचे एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे ध्येय पूर्ण होणार', मुख्यमंत्री दावोस दौऱ्यासाठी रवाना

आज दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीसाठी चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, हर्षवर्धन पाटील, अतुल सावी, राधकृष्ण विखे पाटील हे दिल्लीत दाखल झाले आहेत. दरम्यान आजच्या भाजपच्या बैठकीत त्या 32 जागांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शिंदे गट आणि अजित पवार गटाला किती जागा?

एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आजित पवार गट हा 16 जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही आजीत पवार गटाला 6 जागा, तर शिंदे शिवसेना गटाला 10 मिळणार असल्याची साम टीव्हीच्या विश्वसनीय सूत्रांची माहिती दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply