Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार; शरद पवारांचं टेन्शन वाढणार?

Maharashtra Politics : आगामी लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. रायगडच्या कर्जत मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड भाजपच्या गळाला लागले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सुरेश लाड उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहे

कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांचे एकेकाळी  अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते. मात्र, अलिकडे त्यांच्यातील हा स्नेह कमी झाला होता. राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड यांनी अनेकदा जाहीर नाराजीही व्यक्त केली होती.

Mumbai Bomb Blast : मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्तासोबत ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांची पार्टी, नितेश राणेंचा विधानसभेत गंभीर आरोप

मात्र, काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप झाला होता. अजित पवार यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांनी  शरद पवार यांची साथ सोडत भाजपसोबत हातमिळवणी केली. एवढ्या मोठ्या राजकीय भूकंपानंतरही सुरेश लाड हे तटकरे यांच्या बरोबर न राहता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी बरोबर राहिले होते.

मात्र, आता त्यांनी थेट भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्जत येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडणार आहे. दरम्यान, सुरेश लाड यांच्यासोबत काही नगरसेवक, तालुका अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे काही सदस्य देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. भाजपने कोकणातील रायगड जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. अजितदादांची राष्ट्रवादी सरकारमध्ये सहभागी होण्याअगोदरच भाजपाने हा प्लान आखला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply