
Maharashtra Politics : रमी खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना लातूरमध्ये बेदम मारहाण करण्यात आली होती. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांची युवक प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. पण अवघ्या काही महिन्यामध्येच सूरज चव्हाण यांच्याकडे पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीसपदी सूरज चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. यावरून आता अजित पवार गटावर टीका होऊ लागली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात थेट अजित पवारांनाच प्रश्न विचारला आहे.
रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत सूरज चव्हाण यांची पक्षाच्या मोठ्या पदावर नियुक्ती करण्यात आल्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'लातूरमध्ये केलेल्या गुंडगिरीप्रकरणी पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेण्याचा अजितदादांचा निर्णय योग्यच होता. परंतु महिनाभराच्या आतच त्या वादग्रस्त पदाधिकाऱ्याचे प्रमोशन केले जात असेल तर याला काय म्हणायचं?'
अजित पवार यांच्यावर प्रतिमेला धक्का देण्याचे काम केले जात असल्याचा आरोप करत रोहित पवार पुढे म्हणाले की, 'अजितदादांच्या पक्षात दोन गट असून दुसरा भाजपप्रेमी गट जाणूनबुजून अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्यरत असतो. ‘शब्दाला पक्का’ या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी कालची वादग्रस्त नियुक्ती केली गेली अशी चर्चा आहे. मारहाण करताना फ्रॅक्चर झालेल्या हातावरील प्लास्टरचा पट्टा निघण्याच्या आतच प्रमोशन केलं, नियुक्ती करणाऱ्याच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. शेवटी, ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’!'
|
Maharashtra : कोकणात राजकीय भूकंप! शरद पवारांना जबरदस्त धक्का, बडा नेता भाजपाच्या गळाला |
सूरज चव्हाण यांच्या प्रमोशनवर अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया देत अजित पवार गटावर टीका केली आहे. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाणारे वर्तन हे स्वीकारले जाणार नाही. म्हणून कठोर निर्णय घेऊन सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी पक्षाने बाजूला केले असे ट्वीट अजित पवारांनी २१ जुलै रोजी केले होते. या ट्वीटचा स्क्रीन शॉर्ट पोस्ट करत अजंली दमानिया यांनी अजित पवारांना अनेक सवाल केले आहेत.
तर, '२३ दिवसानंतर पलटून जे युवक अध्यक्ष होते त्यांना प्रमोशन देऊन त्यांना सरचिटणीस केले. तर आता अशा पक्षाला काय म्हणायचं? अशा पक्षाचे नेते अजित पवारांना काय म्हणायचं? त्या पक्षाच्या अध्यक्षाला काय म्हणायचं? जे त्यांच्या पक्षाला खरे राहू शकत नाही. ते बोलतात एक आणि करतात एक. असे जे लोक असतात त्यांच्यावर लोकांनी किती विश्वास ठेवायचा हे जनतेने ठरवायला हवं.', अशी टीका दमानिया यांनी केली.च
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

