Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर उद्या महासुनावणी, ठाकरे गटानंतर आता शिंदेंचे वकील बाजू मांडणार

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाला उद्यापासून सलग तीन दिवस सुनावणीला सुरूवात होणार आहे. आत्तापर्यंत ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील ॲड कपील सिब्बल, ॲड अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. आता ठाकरे गटाने बाजू मांडल्यानंतर उद्या शिंदे गटाचे वकील बाजू मांडणार आहे.

शिंदे गटाच्या वतीने ॲड हरीष साळवे, ॲड निरज किशन कौल, ॲड मनिंदर सिंह बाजू मांडणार आहेत. तसंच राज्यपालांच्या वतीने तुषार मेहता बाजू मांडतील. त्यामुळे आता शिंदे गटाचे वकील काय युक्तिवाद करतात याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

या दोन्ही पक्षांसोबतच जनतेच्या वतीने ॲड असिम सरोदे यांच्यासारख्या वकीलांनी याचिका दाखल केल्या आहेत. त्यांना देखील न्यायालय बाजू मांडण्याची संधी देऊ शकते. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या सुनावणीत शिंदे गट, राज्यपाल आणि जनतेच्या वतीने वकील युक्तीवाद करतील. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply