Maharashtra Political Crisis Updates : राज्यातील सत्तासंघर्षाचा आज तिसरा दिवस; निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष

Maharashtra Political Crisis Updates : राज्यातील सत्तासंघर्षांवर सुरू असलेल्या सुनावणीचा आज तिसरा दिवस आहे. काल खटल्यामध्ये नबाम रेबिया प्रकरणी घटनापीठाने दिलेल्या निकालाच्या फेरविचाराबाबत निर्णय घटनात्मकदृष्टय़ा कठीण असल्याची तोंडी निरीक्षण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले. उद्धव ठाकरे विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न गेल्यामुळे रेबिया निकालाचा फेरविचार काथ्याकूट ठरतो, असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वतीने करण्यात आला. या निकालाकडे समस्त राज्याचे लक्ष लागले आहे.

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यामध्ये बुधवारी रात्री उशीरा भारतीय सीमेत घुसखोरी करणाऱ्यांविरोधात सुरक्षा दलांनी कारवाई केली. हा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत असताना एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले. सैन्य आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने घुसखोरांना रोखल्यानंतर कुपवाडाच्या सैदपोरा फॉरवर्ड भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक उडाली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply