Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्ष प्रकरणात मोठी अपडेट! ४० आमदारांनी नोटीसीला उत्तर देण्यासाठी मागितली मुदतवाढ

Shivsena Crisis: शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राज्यात झालेल्या सत्तासंघर्षाचं प्रकरण आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटातील 54 आमदारांना अपात्रतेबाबत नोटीस पाठवून उत्तर देण्यास सांगितले होते. नार्वेकर यांनी दिलेली ही मुदत संपली असून 40 आमदारांनी या नोटीसीला उत्तर देण्यासाटी मुदतवाढ मागितली आहे, तर इतर १४ आमदारांच्या उत्तराचा आढावा घेणे अद्याप बाकी आहे.

आमदारांनी विधीमंडळ कामकाज सुरु असल्याने मुदतवाढ मिळावी अशी विनंती केली आहे. त्यामुळे या आमदारांना नोटीसीला उत्तर देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष किमान दोन आठवड्यांची मुदतवाढ देण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष, सचिव आणि इतर अधिकाऱ्यांची यासंदर्भात आढावा बैठक पार पडली. या आढावा बैठकीत यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार; गृहमंत्री अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित

राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीच निकाल दिला आहे. तसेच आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी रिजनेबल टाईमध्ये घ्यावा असे देखील सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे शिवसैनिक आणि राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे. या संदर्भातच राहुल नार्वेकरांनी आमदारांना नोटीस पाठवली असून या नोटीसचं उत्तर देण्यासाठी आमदारांनी आणखीन थोडा वेळ मागितला आहे. 

उद्धव ठाकरे 14 जुलै रौजी गटाकडून सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत विधानसभा अध्यक्षांना लवकरात लवरकर निर्णय घेण्याचे निर्देश देण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. त्यावर सुनावणी दरम्यान न्यायालयाने अध्यक्षांना नोटीस पाठवून या प्रकरणात काय कारवाई केली याचे उत्तर मागितीले होते. यासाठी कोर्टाने अध्यक्षांना दोन आठवड्याची मुदत दिली होती. त्यामुळे 30 तारखेपर्यंत अध्यक्ष त्या नोटीसीला उत्तर देऊ शकतात किंवा ते कोर्टाकडून उत्तर देण्यासाठी वेळही मागवून घेऊ शकतात.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply