Maharashtra Police : दोन हजाराच्या नोटा बदलून देण्याच्या आमिषानं फसवणूक; पोलिस हवालदारासह तिघांना अटक

शिरगुप्पी, कागवाड : दोन हजाराच्या नोटा बदलून ५०० रुपयांच्या नोटा देण्याचे आमीष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी मिरज येथील पोलिस हवालदारासह  तिघांना कागवाड पोलिसांनी अटक केली.

याबाबत माहिती अशी, महाराष्ट्रातील समीर भोसले यांना टोळीतील दोन हजाराच्या नोटा बदलून देतो, असे भासवून त्यांचा विश्वास संपादन केला. मंगसुळी येथील मल्लय्या देवस्थानाच्या परिसरात समीर भोसले यांना नोटा घेऊन येण्यास टोळीप्रमुखांने सांगितले.

बुधवारी (ता. ३१) समीर भोसले यांनी सायंकाळी तेथे गेले असता टोळीने त्यांना ‘तुमच्या नोटा द्या, आम्ही आमच्या देतो’, असे सांगितले. त्यानुसार समीर भोसले यांनी पाचशे रुपयांच्या पाच लाख रुपये नोटा त्यांच्या हवाली केले. मात्र, त्यांना देण्यात येणारे २००० च्या नोटा देताना त्यांना फसवून पोलीस आले पोलीस आले असे सांगून तेथून धूम ठोकले. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य पोलीस दलात सेवा बजावत असणारा पोलीसही सामील होता.

आपण पूर्णपणे फसलो गेलो आहे, असे त्यांना खात्री झाल्याने त्याच दिवशी सायंकाळी कागवाड पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानुसार कागवाड पोलीस स्थानकाचे फौजदार हनुमंत नरळी, सीपीआय रवींद्र नाईकवाडी यांनी गुन्ह्याची नोंद करून तपास केला असता याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस दलातील तासगाव पोलीस ठाण्यातील पोलीस म्हणून कार्यरत असलेला एकजण व अन्य दोघे यांच्यावर गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply