Maharashtra News LIVE : राहुल गांधी आज मुंबईत, भिवंडी सत्र न्यायालयात राहणार हजर

  • 21 Feb 2026 09:53 AM (IST)

    गृह विभागाने काढली माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची वाय प्लस सुरक्षा

    माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची वाय प्लस सुरक्षा गृह विभागाने काढली आहे. सुरक्षा पुनरावलोकन समितीच्या अहवाला नंतर निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.  अंबादास दानवे यांचा विरोधी पक्षनेते पदाचा कालावधी संपल्यानंतर वाय प्लस सुरक्षा काढून घेण्यात आली.

  • 21 Feb 2026 09:43 AM (IST)

    संतोष देशमुख खून प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी.

    बीड – संतोष देशमुख खून प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी होणार आहे. आरोप निश्चिती झाल्यानंतर आज प्रथमच खून आणि खंडणी या प्रकरणांवर युक्तिवाद सुरू होण्याची शक्यता आहे.  आजच्या सुनावणीत आरोपी विष्णू चाटे याने बीड कारागृहात ठेवण्यासंदर्भात केलेल्या अर्जावर देखील सुनावणी होऊ शकते.

  • 21 Feb 2026 09:33 AM (IST)

    पोलिस असल्याचे सांगून भामट्यांचा वृद्धेला गंडा, दीड लाखांचे दागिने लंपास

    जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरात तीन भामट्यांनी महिलेची फसवणूक केली.  आम्ही पोलिस आहोत, पुढे खून झालाय,  पुढे जाऊ नका, असे सांगून तीन भामट्यांनी वृद्धेला फसवलं आणि तिचे 1 लाख 56 हजारांचे सोन्याचे दागिने काढून घेऊन फसवणूक केली.

  • 21 Feb 2026 09:23 AM (IST)

    वाळूज येथे सावत्र बापाकडूनच मुलीवर अत्याचार, आरोपी फरार

    छत्रपती संभाजीनगरमध्ये माणू,सकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. वाळीज परिसरात सावत्र बापानेच चिमुरड्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनमतर आरोपी पिता फरार झाला असून  पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे.

  • 21 Feb 2026 09:12 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगर – ​शिवजयंतीच्या मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी केला हात साफ

    छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक परिसरात शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुकीत चोरट्यांनी डल्ला मारला.  छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात दर्शनासाठी झालेल्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला.  मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या 12 महिलांची मंगळसूत्रे आणि 3 तरुणांच्या सोन्याच्या साखळ्या चोरट्यांनी लांबवल्या आहेत.

  • 21 Feb 2026 09:04 AM (IST)

    धाराशिव जिल्ह्यात भूम, परांडा आणि वाशी तालुक्यात ठाकरे शिवसेनेला खिंडार ?

    भूम, परंडा आणि वाशी तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी आता पक्षांतराची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पराभूत झालेल्या उमेदवारांनी घेतलेल्या मंथन बैठकीत पक्षांतराचा सूर दिसत आहे.

  • 21 Feb 2026 09:04 AM (IST)

    राहुल गांधी आज मुंबईत

    लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज मुंबईत येणार आहेत. त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राहुल गांधी सकाळी 9 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील.  त्यानंतर भिवंडी सत्र न्यायालयामध्ये 11.30 वाजता हजर होणार आहे. राहुल गांधींच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्ते मुंबई विमानतळावर पोहोचले आहेत.



  • विडियो गॅलेरी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *