Cyber Crime: सावधान! माजी पोलीस आयुक्तांच्या नावे मॅसेज आल्यास काळजी घ्या; हेमंत नगराळेंनी दिली धक्कादायक माहिती

Hemant Nagrale : सध्याच्या घडीची एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या नावे बनावट फेसबुक पेज सुरु करण्यात आलं आहे. या पेजचा वापर करुन नागरिकांची मोठी फसवणूक केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, माजी पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या नावे सुरु केलेल्या या फेसबुक पेजहून त्यांच्या फ्रेंडलिस्टमधील व्यक्तींना मेसेज पाठवले जात आहे. त्यांच्याशी चॅटींग करुन आधी जवळीकता साधली जात आहे. त्यानंतर हे चोरटे थेट नागरिकांच्या बँक खात्यावर डल्ला मारत आहेत.

जवळीक साधल्यानंतर हे सायबर चोरटे त्या व्यक्तींना आपली अडचण सांगत पैशांची मागणी करत आहेत. माजी पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या नावाने पैसे मागितल्याने सर्वसामान्य नागरिक याला बळी पडत आहे. नगराळे यांना पैशांची गरज आहे आपण त्यांना मदत करायला हवी असे, समजून नागरिक त्यांना पैसे देत आहेत.

दरम्यान, याबाबत स्वत: हेमंत नगराळे  यांनी आपल्या फेसबुक पेजवर बनावट पेजचा फोटो अपलोड केला आहे. तसेच नागरिकांनी सतर्क रहावे व संबधित बनावट पेजवरून आलेल्या मेसेजला बळी पडू नये असे आवाहन केले आहे.
 
काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे अप्पर पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या नावे बनावट फेसबुक पेज बनवण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी देखील आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते.
 
सायबर क्राईमच्या अनेक घटना घडत आहेत. यावर आळा घालण्यासाठी पोलिसांची टीम सातत्याने काम करत आहे. फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया अकाऊंट्सचा वापर करुन दिवसेंदिवस ऑनलाइन गुन्ह्याच्या घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशात आता आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील  यांच्यानंतर माजी पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यासोबत देखील अशी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply