Maharashtra Politcs : नणंद लोकसभेत तर भावजय राज्यसभेत! सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड

Maharashtra Politcs :  बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांची अखेर राज्यसभेत बिनविरोध निवड झाली आहे. आज त्यांनी विधानसभेत जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानतंर अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड झाली आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज दुपारी ३ वाजेपर्यंत अंतिम मुदत होती. परंतु, ३ वाजेपर्यंत सुनेत्रा पवारांशिवाय कोणाचाही अर्ज न आल्याने सुनेत्रा पवारांची बिनविरोध झाली. आज त्यांनी दुपारी विधानसभेत जाऊन उमेदवारी अर्ज भरला. महायुतीच्या वतीने भाजपाच्या कोट्यातून त्यांनी हा अर्ज भरला होता.

Sambhajinagar Accident News : दोन वेगवेगळ्या अपघातात एकाचा मृत्यू; 13 जखमी

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुनेत्रा पवारांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या, “पक्षाने मला राज्यसभेची अधिकृत उमेदवारी दिली आहे, त्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, इतर नेते आणि पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानते.”

दरम्यान, सुनेत्रा पवार यांना यावेळी विचारण्यात आलं की तुमचा पक्ष केवळ अजित पवार यांच्या कुटुंबापुरता सीमित झाला आहे अशी टीका होत आहे, त्याबाबत काय सांगाल? त्यावर सुनेत्रा पवार म्हणाल्या, “माझ्या उमेदवारीचा निर्णय पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांनी मिळून घेतला आहे. आज माझा उमेदवारी अर्ज भरताना स्वतः छगन भुजबळ यांच्यासह पक्षातील इतर नेतेही उपस्थित होते. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे मी ठामपणे सांगेन की पक्षात कोणत्याही प्रकारची नाराजी नाही.”

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply