Maharashtra : “९० दिवसांत आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय नाही घेतला, तर…”, संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांना इशारा

उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा हा नैतिकतेच्या मुद्द्यावर दिला होता. आम्ही सत्तेसाठी भूकेलेलो नाही. सत्ता सोडली आम्ही. पण, तुम्ही जे आले आहात, ते बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने यांची चामडी सोलत नागडं केलं आहे. तरीही, हे पेढे वाटून नाचत आहेत, अशा शब्दांत शिवसेना ( ठाकरे गट ) संजय राऊत यांनी शिंदे गटाला फटकारलं आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“सरकार बेकायदेशीर आणि अपात्र ठरलं आहे. सर्वोच्च न्यायालय निर्घूण अपराधाला फाशीची शिक्षा ठोठावतं. फाशीचा दोर जल्लादाकडे असतो. त्यामुळे शिक्षा ठोठावून न्यायालयाने विधिमंडळातील लोकांकडे पाठवलं आहे. त्यांनी फाशी द्यायची आहे. तसेच, ९० दिवसांत विधिमंडळ अध्यक्षांना अपात्रतेचा निर्णय घ्यावा लागेल. विधिनसभा अध्यक्षांना अपात्रतेची फाईल दाबता येणार नाही. ९० निर्णय नाही घेतला, तर महाराष्ट्र काय आहे, हे त्यांना कळेल,” असा इशारा संजय राऊतांनी राहुल नार्वेकर यांना दिला आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply