Sharad Pawar : पक्ष चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही; शरद पवारांचा कार्यकर्त्यांना विश्वास

Maharashtra NCP Crisis : राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्यानंतर अजित पवार गटाकडून पक्ष आणि चिन्ह आपलाच असल्याचा दावा सात्तत्याने केला जात आहे. छगन भुजबळ यांनी देखील आजच्या भाषणात पक्ष आणि चिन्ह आपलाच आहे, कायद्याचा संपूर्ण अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतला असे सांगितले. यानंतर वायबी चव्हान सेंट्र येथे बोलताना शरद पवार यांनी पक्ष चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला आहे.

आपलं नाणं चालणार नाही याची त्यांना कल्पना

राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेल्या आमदारांविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, त्यांना माहिती आहे आपलं नाणं चालणार नाही. त्यांचं नाणं खरं नाहीये, म्हणून त्यांनी माझा फोटो वापरला. एकीकडे पांडुरंग म्हणायचं, गुरू म्हणायचं, आणखी काय काय म्हणायचं आणि दुसरीकडे आमच्याकडे दुर्लक्षे केलं म्हणायचं असं नसतं, असे देखील पवार म्हणाले.

Uddhav Thackeray : आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा; राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांसाठी घेतला मोठा निर्णय

"भाजपचं हिंदुत्तव विषारी, विघातक, मनुवादी"

शरद पवार म्हणाले, शिवसेनेसोबत गेलो म्हणून प्रश्न उपस्थित केला गेला. तुम्ही शिवसेनेबरोबर गेले म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो असे सांगितले जाते. शिवसेना हिंदुत्ववादी आहे हे खरं आहे, त्यांनी ते लपवून ठेवलेलं नाही. पण शिवसेनेचं हिदुत्व हे सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन जाणारं हिंदुत्व आहे. भाजपचं हिंदुत्व हे विषारी, विघातक, मनुवादी, माणसामाणसांत फूट पाडणारं आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply