
Maharashtra MLC Election Results 2023 : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचे अंतिम कल हाती आले असून निवडणूकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. त्यांचे ५ पैकी ३ जागेवरील उमेदवार निवडून आले आहे. नाशिकमधील जागा महाविकास आघाडीने गमावली असली तरी, नागपूर, अमरावती आणि औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीने अपेक्षित यश मिळवलं आहे.
दुसरीकडे निवडणूकीत भाजपला केवळ १ जागा मिळाली आहे. दरम्यान, विधानपरिषदेच्या शिक्षक पदवीधर निवडणूकीत ५ पैकी ३ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्याने कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे
देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात भाजपला मोठा धक्का बसला आहे. नागपुर शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडी पुरस्कृत कॉंग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजप पुरस्कृत उमेदवार नागो गाणार यांचा पराभव केला आहे.
अडबाले यांना १६ हजार ५०० मते मिळाली, तर गाणार यांना ६ हजार ३६६ मतांवर समाधान मानावे लागले. पहिल्या फेरीत अडबाले यांना १४ हजार ७१ मते मिळाली. तर गाणार ६ हजार ३०९ मतांवर राहिले. अडबाले यांनी पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण करून विजय मिळवला.
औरंगाबादेतून विक्रम काळे विजयी
मराठवाडा शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे चौथ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे हे विजयी झालेत. निवडणूकीत विक्रम काळे यांना पारड्यात मतदारांनी भरभरून मतं टाकली असून त्यांनी भाजपचे उमेदवार किरण पाटील यांचा ६ हजार ९३७ मतांनी पराभव केला आहे. या मतमोजणीला तब्बल १५ तास लागले. दुसऱ्या पसंतीच्या मतांची ही मोजणी करण्यात आली. विक्रम काळे विजयी होताच, कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला असून भाजपने मोठी ताकद लावूनही मतदारांनी त्यांना जागा दाखवून दिली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार सतीश चव्हाण यांनी दिली आहे.
अमरावतीत मविआचे धीरज लिंगाडे विजयी
दुसरीकडे अमरावती निवडणूकीत झालेल्या अटीतटीच्या लढाईत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला आहे. धीरज लिंगाडे यांना ४३ हजार ३४० मतं, तर रणजित पाटील यांना ४१ हजार ०२७ मतं मिळाली आहेत. याशिवाय ८ हजार ५५१ अवैध मते झाली आहेत.
नाशिकमध्ये सत्यजित तांबेंचा विजय
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी विजय मिळवला असून महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे.
काँग्रेसमधून बंड करत सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीवर लागून होतं. अखेर निवडणूकीत सत्यजित तांबे यांचा विजय झाला असून त्यांना एकूण ६८ हजार ९९९ मतं मिळवली आहे. तर शुभांगी पाटील यांना केवळ ३९ हजार ५३४ मतांवर समाधान मानावं लागलं आहे. त्यांचा तब्बल २९ हजार ४६५ मतांनी पराभव झाला आहे.
कोकणमध्ये भाजप उमेदवाराचा विजय
कोकण विधान परिषद निवडणूकीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहेत. त्यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार आणि विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांना पराभवाचा धक्का दिला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे बाळाराम पाटील आणि भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात सरळ लढत होती. या निवडणुकीत बाळाराम म्हात्रे यांना २० हजार ८०० मते मिळाली. तर शेकापचे बाळाराम पाटील यांना ९ हजार ५०० मते मिळाली. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी ११ हजार ३०० मताधिक्य घेत आपला विजय नोंदवला आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

