Maharashtra Loksabha Election : राज ठाकरेंच्या मनसेला कुठे संधी? एका जागेवर तयारी, दुसऱ्या ठिकाणी विरोध

Maharashtra Loksabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये अजून एका पक्षाचा समावेश झालाय. तो पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. महायुतीत नव्यानेच दाखल झालेल्या मनसे आणि भाजपमध्ये लोकसभेच्या जागावाटपावरून मतभेद होण्याची शक्यता आहे. सध्या भाजप आणि मनसेमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरूये. भाजप मनसेला दक्षिण मुंबईची जागा देण्यास तयार नसल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

एका दिवसापूर्वीच लोकसभेच्या मागणीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्ली वारी केली होती. दिल्लीवारीत राज ठाकरे यांनी भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. या बैठकीत मनसेने अमित शाह यांच्याकडे मुंबईतील दोन जागांची मागणी केली. यामध्ये दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेचा समावेश आहे. दक्षिण मुंबईच्या जागेवर राहुल नार्वेकर भाजपकडून निवडणूक लढू शकतात. परंतु भाजप दक्षिण मुंबईची जागा देण्यास तयार नाहीये. तर शिर्डीतील जागा मनसेसाठी सोडणार असल्याचं सांगितलं जात आहे.

New BMC Commissioner : भूषण गगराणी BMC चे नवे आयुक्त; ठाणे आणि नवी मुंबईलाही नवीन आयुक्त मिळाले!

मात्र मुंबईच्या जागांवरून मनसेत नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मनसे येथून बाळा नांदगावकर यांना मैदानात उतरवण्यासाठी इच्छूक आहे. मात्र मुंबईतून मनसेला दोन देणे कठीण असल्याचं अमित शाह यांनी राज ठाकरे यांना सांगितल्याची माहिती देखील समोर येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपांबाबतची राज ठाकरे यांनी अमित शाह यांना विचारणा केली. कारण चार पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल. मात्र विधानसभेच्या जागांबाबत आताच काहीही आश्वासन देण्यास अमित शाह यांनी नकार दिल्याचं सांगितलं जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply