Maharashtra Lok Sabha Election Phase 2 : महाराष्ट्रातील 8 मतदारसंघात प्रचाराचा ताेफा आज थंडावणार; अमित शाह, राहूल गांधींच्या सभा

Maharashtra Lok Sabha Election Phase 2 : अमरावती लोकसभा मतदारसंघासह गेल्या पंधरा दिवसांमध्ये प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपच्या फैरी झडल्या. येत्या 26 एप्रिलला दुस-या टप्प्यातील मतदान आहे. यामध्ये हिंगाेली, वर्धासह पश्चिम विदर्भातील यवतमाळ - वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. परिणामी आज (बुधवार) सायंकाळी सहा नंतर आठ मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.

वर्धा लाेकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस विरुद्ध एनसीपी शरद पवार गटाचे अमर काळे यांच्यात लढत हाेणार आहे. तडस यांच्या प्रचारार्थ आज वर्धा लोकसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांच्या दोन सभा हाेणार आहे. दुपारी 12 वाजता पुलगाव येथे तर 4 वाजता वर्धेत सभा हाेईल.

Bees Attack School Children: शाळकरी मुलांवर मधमाशांचा हल्ला, ४० जण जखमी; सहा जणांची प्रकृती चिंताजनक

आज अमर काळे यांचा वर्धा शहरासह आजूबाजूच्या गावात प्रचार दौरा आहे. त्यांच्या समवेत माजी मंत्री व आमदार रणजित कांबळे हे देखील आहेत.

बुलढाणा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरुद्ध ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर हे निवडणुक लढवत आहेत तसेच अपक्ष रविकांत तुपकर सुद्धा झुंज देत आहेत.

या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार जाधव यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांची चिखली येथे दुपारी सभा हाेणार आहे. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रचार सुरु राहणार असून त्यानंतर जाहीर प्रचार बंद होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात सभांचा सपाटा सुरु आहे.

अमरावती मतदारसंघात भाजपच्या नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखडे तसेच प्रहारचे दिनेश बुब आणि आनंदराज आंबेडकर यांच्यात लढत असेल. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अमरावती येथील सायन्स कोअर मैदानात सभा हाेणार आहे. काॅंग्रेस नेते राहूल गांधी यांची देखील अमरावती येथे सभा हाेणार आहे.

यवतमाळ - वाशीम मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख यांच्यात लढत हाेत आहे तर बसपाकडून हरिभाऊ राठोड रिंगणात आहेत. अकोल्यात वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, भाजपचे अनुप धोत्रे आणि कॉंग्रेसचे अभय पाटील अशी लढत असणार आहे. या बराेबरच हिंगाेली, परभणी आणि नांदेड येथे आज प्रचाराचा अंतिम टप्पा आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply