Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीच्या जळगाव, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला; उमेदवार कोण?

Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भातील महत्वाची अपडेट समोर आली आहे. महाविकास आघाडीमध्ये जळगाव आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला असून आता रामटेक आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये चुरस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. उद्याच्या महाविकास आघाडीमधील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत सर्व 48 जागांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाविकास आघाडीमध्ये  जळगाव आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगली आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलावली आहे. महाविकास आघाडीमध्ये हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिवसेना लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

Maldives China Military Deal : मालदीवचा चीनसोबत करार, भारतीय सैनिकांची एक्झिट

याआधी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटासोबत राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा ही जागा लढवण्यासाठी आग्रही होती. मात्र आता जळगाव लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. हर्षल माने शिवसेना ठाकरे गटाचे संभाव्य लोकसभा उमेदवार असतील.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गट काँग्रेस पक्षाला सोडणार असून त्याऐवजी शिवसेना ठाकरे गट सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा लढवण्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकमत होत आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर श्रीमंत शाहू छत्रपती  हे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार आहेत.

शाहू महाराज हे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवू शकतात. तर सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे संभाव्य उमेदवार असतील. दरम्यान, महाविकास आघाडीची रामटेक आणि दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघ कोणता पक्ष लढवणार यावर अजूनही चर्चा सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply