Maharashtra Lok Sabha : उत्तर पश्चिम मुंबईमध्ये शिंदे गटाला उमेदवार मिळेना; महागुरुंसह दोन बड्या कलाकारांचा निवडणुकीस नकार

Maharashtra Lok Sabha : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात राजकीय नेत्यांसहित अभिनेतेही प्रचारात उतरले आहेत. राज्यातील कडक उन्हातही उमेदवारांकडून प्रचार सुरु आहे. एकीकडे राजकीय पक्षांचे काही उमेदवार निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. तर दुसरीकडे काही जागांवर राजकीय पक्षांना लोकसभा मतदारसंघात उमेदवारही मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. उत्तर पश्चिम मुंबईमधून शिंदे गटालाही उमेदवार मिळाला नाही. काही कलाकारांनीही या मतदारसंघात निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे उत्तर पश्चिम मुंबईमधून कोणाला उमदेवारी द्यायची, असा प्रश्न शिंदे गटासमोर उभा ठाकला आहे.

राज्यात लोकसभा निवडणुका ६ टप्प्यात पार पडणार आहेत. राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा रंग चढला आहे. या लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने पंधरा दिवसांपूर्वीच मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात अमोल गजानन कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली. ठाकरे गटाने अमोल गजानन कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. तसेच त्यांनी प्रचार दौरेही सुरु केले आहेत.

Sarangkheda News : तापी नदी पात्रात एकाच दिवशी 2 युवकांची आत्महत्या; थरारक घटनेनं गावकऱ्यांमध्ये खळबळ

अमोल कीर्तिकरांनी प्रचाराला सुरुवात केली असताना, दुसरीकडे शिंदे गटाला मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी सक्षम उमेदवार मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे. ही जागा शिंदेंच्या सेनेला मिळाली, असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जागेसाठी आतापर्यंत पक्षातील पदाधिकारी, अभिनेत्यांची चर्चा केली आहे. तरीही या मतदारसंघासाठी सक्षम उमेदवार मिळाला नसल्याची माहिती समजत आहे.

मुख्यमंत्र्यांनी या लोकसभा मतदारसंघासाठी अभिनेता गोविंदा, शरद पोंक्षे, सचिन पिळगावकर यासारख्या अभिनेत्यांसोबतही उमेदवारीबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती समजत आहे. मात्र, तिन्ही कलाकार निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे समजत आहे. तर यामुळे शिंदे गटाने जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र वायकर यांना देखील निवडणूक लढण्याबाबत विचारणा केली. मात्र, वायकर यांना देखील भाजपकडून विरोध होत असल्याने शिंदे गटाची उमेदवारीबाबत मोठी अडचण निर्माण झाली आहे. या उमेदवारीवरून शिंदे गटासमोर मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply