Maharashtra-Karnataka Border Dispute : बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला, सीमावाद आणखी चिघळण्याची शक्यता

Maharashtra-Karnataka Border Dispute : बेळगाव: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. बेळगाव येथे महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे. हिरबागेवाडी टोलनाक्यावर ही घटना घडली आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रातील मंत्र्यांनी संताप व्यक्त केला आहे.

बेळगाव शहर आणि परिसरात कन्नड संघटनांनी मंगळवारी सकाळपासूनच वातावरण बिघडण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसले. काही वेळापूर्वी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील हिरे बागेवाडीजवळ महाराष्ट्र राज्यातील वाहनांना लक्ष्य करण्यात आले. वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र सरकारने सीमा समन्वयक मंत्र्यांची नेमणूक केली होती. त्यानंतर राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई बेळगावला जाणार होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची ते संवाद साधणार होते. पण मंत्री बेळगावात येऊ नये यासाठी गेल्या ४ ते ५ दिवसांपासून कन्नड संघटनांनी बेळगाव शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगाव जिल्हाबंदीचा आदेश बजावल्यानंतर देखील कन्नड संघटना जाणीवपूर्वक मराठी भाषिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

कन्नड संघटनांमुळे शहराचे वातावरण बिघडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तरीही राष्ट्रीय महामार्ग आणि इतर ठिकाणी कन्नड संघटना जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. हिरेबागेवाडी येथे महाराष्ट्रातील ट्रक व इतर वाहनांवर चढून धिंगाणा घालण्यात आला. तसेच लाल- पिवळे झेंडे फडकून महाराष्ट्र सरकार आणि मराठी भाषिकांविरोधात गरळ ओकण्याचे काम कन्नड संघटनांनी केले. कन्नड संघटनाना वेळीच रोखावे अन्यथा मराठी भाषिक जशास तसे उत्तर देतील, असा इशारा यावेळी मराठी भाषिकांनी दिला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply