Pune : हडपसरची परंपरा झाली खंडित, इतिहास बदलला, असे काय घडले ? राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार चेतन तुपे विजयी

Pune : शहरातील सर्वाधिक मतदारसंख्या अशी ओळख असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले. मतमोजणीच्या दिवशी देखील या मतदारसंघात अनेक महत्त्वाच्या घडामोडीमुळे हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला. मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात या मतदारसंघात घडलेल्या घडामोडींमुळे या मतदारसंघाचा आतापर्यंत असलेला इतिहास बदलला. राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार) अशी लढत येथे झाली.

विद्यमान आमदारांना बाजूला करून विधानसभेमध्ये नवीन उमेदवाराला संधी देण्याची हडपसरकरांची परंपरा आहे. मात्र यंदाच्या वर्षी ही परंपरा खंडित झाली. अखेरच्या टप्प्यात अटीतटीच्या झालेल्या लढतीमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांचा विजय झाला. हडपसरमधून सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याचा मान तुपे यांना मिळाला. त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांचा सात हजार मतांनी पराभव केला.

Maharashtra Election Result : पराभव दिसताच संजय राऊतांनी फोडलं EVM वर खापर.. भन्नाट मिम्स तुफान व्हायरल

पाच वर्षांपूर्वी झालेल्या २०१९ च्या निवडणुकीत चेतन तुपे यांना ९२ हजार ३२६ मते मिळाली होती. भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांचा पावणेतीन हजार मतांनी पराभव केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर महाविकास आघाडीने हडपसरची जागा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला सोडण्यात आली. या मतदारसंघातून प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. मनसेकडून शहर प्रमुख साईनाथ बाबर यांनी निवडणूक लढविली तर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे बंडखोर गंगाधर बधे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली.

मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून चेतन तुपे यांनी आघाडी घेतली होती. पंधराव्या फेरीपर्यंत तुपे यांची आघाडी चांगलीच वाढली होती. त्यानंतर प्रशांत जगताप यांनी त्यांची आघाडी कमी करत जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे निकालात रंगत निर्माण झाली होती. हडपसरमध्ये एकाच उमेदवाराला दोनवेळा संधी मिळत नाही, असा गेल्या अनेक वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे हडपसरकर आपला कौल कोणाच्या बाजूने देणार याबाबत अखेरच्या क्षणापर्यंत मोठी उत्सुकता होती. शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये सात हजारांचे मताधिक्य घेत तुपे यांनी विजय मिळविला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply