Maharashtra Election : पंकजा मुंडेंचं टेन्शन वाढलं; ओबीसी बहुजन पार्टीचा उमेदवार बीड लोकसभेच्या रिंगणात

Maharashtra Election : ओबीसी बहुजन पार्टीने बीडमध्ये आपला उमेदवार दिला आहे. पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे यांच्या उमेदवारीनंतर आता ओबीसी बहुजन पार्टीने देखील बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये आपला उमेदवार  दिला आहे. त्यामुळे ओबीसी आंदोलनामध्ये प्रमुख चेहरा असलेले प्राध्यापक टी.पी मुंडे  यांच्या नेतृत्वामध्ये बीडची निवडणूक लढली जाणार आहे. यामुळे पंकजा मुंडे यांचं टेन्शन वाढलं  आहे.

ओबीसींवर होणारा अन्याय थांबावा, यासाठी ओबीसीचे प्रश्न संसदेत मांडता यावे, यासाठी उमेदवार दिले आहेत. आम्हाला छगन भुजबळ यांचा आशीर्वाद असल्याचं देखील टी.पी मुंडे यांनी म्हटलं  आहे. त्याचबरोबर आम्ही पंकजा मुंडेंना ओबीसी मानत नाहीत. त्यांनी विकास आणला नाही तर भकास केलंय, रेल्वे कुठंय सांगा ? असा सवाल देखील त्यांनी पंकजा मुंडेंना केला आहे.

Pune Cyber Crime : विवाहविषयक संकेतस्थळावर झालेली ओळख पडली महागात; संगणक अभियंता तरुणीची ४० लाख रुपयांत फसवणूक

तर यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला  आहे. जाळपोळ झाली त्यावेळी आमदार व्यावसायिकांनी, स्वतःची घर स्वतः जाळलेत का? असा सवाल देखील टी.पी मुंडे यांनी मविआचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना केला  आहे. निवडणूकांच्या अनुषंगाने राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे.

बीडमध्ये आता 'मुंडे विरूद्ध मुंडे' अशी निवडणूक आता होणार  आहे. त्यामुळे सगळ्यांचं बीड लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष लागलेलं आहे. लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे देखील आता रिंगणात उतरल्याचं दिसतंय. आता ओबीसी बहुजन पार्टीने देखील त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे. बीडमध्ये चांगलीच राजकीय रणधुमाळी पाहायला मिळतआहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply