Maharashtra Election : मुंबईत महायुतीत ३ जागांचा पेच कायम? २ जागांच्या अदलाबदलीची शक्यता

Maharashtra Election : भाजपने लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर केली. राज्यातील २० मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा भाजपने केली. यामध्ये मुंबईतील दोन जागांचा समावशे आहे. तर उरलेल्या चार जागांपैकी तीन जागांवर नेमकं कोण लढणार हा पेच महातुतीत कायम आहे. महायुतीत रस्सीखेच सुरु असलेल्या तीन जागांमध्ये दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई या तीन लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

दक्षिण मुंबई लोकसभेवर भाजपसह शिवसेनेने दावा केला आहे. याठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे विद्यमान खासदार आहेत. महायुतीत भाजपकडून सध्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, तर शिवसेना शिंदे गटाकडून यशवंत जाधव इच्छूक आहेत.

Vasant More : वसंत मोरेंचं ठरलं? शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयात पोहोचले, प्रतिक्रियाही दिली

उत्तर पश्चिममध्ये सध्या शिवसेनेचे गजानन कीर्तिकर खासदार आहेत. मात्र त्या जागेवरही भाजपने दावा केला आहे. तिथे माजी खासदार संजय निरुपम यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याची चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. उत्तर मध्य लोकसभेत पूनम महाजन विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या जागी भाजपकजडून नव्या चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे.

उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाच्या बदल्यात ठाणे लोकसभा मतदारसंघाची तर दक्षिण मुंबईच्या बदल्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या दोन्ही जागाच्या ठिकाणी शिवसेनेसाठी पोषक वातावरण आहे. या दोन्ही जागांवर सध्या ठाकरेंचे खासदार आहेत, जे शिंदेंसोबत आले नाहीत.

शिवसेनेकडून प्रत्यक्षात १८ जागांची जरी मागणी होत असली तरी १३ जागा शिवसेनेला सोडायला भाजप तयार आहे. अशातच गजानन किर्तीकर यांच्या विरूद्ध मुलानेच दंड थोपटल्याने ती जागा देऊन ठाण्याची जागा घ्यावी. तर दक्षिण मुंबई हाही शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याठिकाणी अरविंद सावंत खासदार असले. तरीही जागा सोडून रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा मिळावी, अशी मागणी शिवसेनेकडून होत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply