Maharashtra Corona Update : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही कोरोंनाच्या नव्या व्हेरियंटचा शिरकाव, अकोला JN.1 बाधित पहिला रूग्ण

Maharashtra Corona Update : राज्यात जेएन.1 व्हेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. यातच अकोल्यातही 'कोरोना'चा सब व्हेरियंट जेएन.1 चा पहिला रुग्ण आढळला असून हा रुग्ण शहरातील असून सद्या त्यांची प्रकृती ठीक असल्याच आरोग्य अधिकारी यांनी सांगितलं आहे.

त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला क्वारंटाईन करण्यात आलं होतं त्यासोबत त्याच्या परिवाराची सुद्धा कोरोना टेस्ट केली असून त्यामध्ये सर्वजण निगेटिव्ह आले आहेत आता हा रुग्ण बरा आहे. तर रुग्ण हा शहरातीलचं असून 5 डिसेंबरला रुग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती आणि त्यानंतर रुग्णाचे नमुने पुणे येथील सह्याद्री रुग्णालयाकडे पाठवण्यात आले.

Kolhapur Accident News : स्टेअरिंगमध्ये बिघाड झाल्याने बसचा अपघात; अनेक प्रवासी जखमी; कोल्हापुरातील घटना

तपासणीत रुग्णात 'जेएन.1 व्हेरियंट विषाणू आढळला असल्याचा अहव्हाल प्राप्त झाला होता. मात्र रुग्ण हा क्वारंटिन राहल्याने आणि सद्या त्यांची प्रकृती ठीक असून त्यांची फॅमिली मध्ये कोणीही पॉझिटिव्ह नसल्याने सद्या जिल्हात किंवा शहरात एकही जेएन.1 व्हेरियंटचा रुग्ण नसल्याचं महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनुप चौधरी यांनी ही माहिती दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply