Maharashtra CM : मुख्यमंत्री कोण? अजितदादांचा देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा, १७८ आमदार पाठिशी !

Eknath Shinde vs Devendra fadnavis : महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपला सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांना ५७ जागांवर यश मिळाले आहे. महायुतीमधील तिसरा मित्रपक्ष अजित पवार यांचे ४१ आमदार निवडून आले आहेत. महायुतीला न भूतो न भविष्य असे यश मिळालं, एकहाती सत्ता मिळाली, आता मुख्यमंत्री कोण? याची चर्चा सुरु झाी आहे. शिवसेना आणि भाजपमधील मुख्यमंत्री होईल, अशी चर्चा आहे. मुख्यमंत्रि‍पदासाठी महायुतीमध्ये रस्सीखेच असल्याचं बोललं जातेय. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आण देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत. (BJP firm on Devendra Fadnavis as Maharashtra CM despite Eknath Shinde)

मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीमधील तब्बल १७८ आमदारांचा देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असल्याचं समोर आलेय. त्याशिवाय अपक्ष पाच आमदारांचा देवेंद्र फडणवीस यांनाही मुख्यमंत्रि‍पदासाठी पाठिंबा आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनाही मुख्यमंत्रि‍पदासाठी फिल्डिंग लावली आहे. शिवसेनेतील माजी मंत्र्‍यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. राज्यातील महिलांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, आशी मागणी केली आहे.

Maharashtra CM : एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, राजकीय हालचालींना वेग

२६ नोव्हेंबर २०१४ रोजी, महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सूपर्द करतील, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर नवा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा शपथविधी पार पडणार आहे. राज्यातील मुख्यमंत्रि‍पदाचा तिडा सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह आज मुंबईच्या दौऱ्यावर येत असल्याचं समजतेय. महायुतीमधील मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न आज मार्गी लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रि‍पदासाठी शिंदे आणि फडणवीस यांनी फिल्डिंग लावली आहे. ४८ तासांत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल, याबाबत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर मंत्रिमंडळात अथवा उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे काम करणार नाहीत. त्यासाठी महायुतीने प्लॅन बी तयार केल्याचं समजतेय. जर एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात न थांबण्याचा निर्णय घेतला, तर त्यांना केंद्रात पाठवलं जाऊ शकते.

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply