महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023-24 : उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार आणि अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. आगामी निवडणुका लक्षात घेता या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता होती. फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत.
सन्मान आपल्या युगपुरुषाचा,ठेवूया आदर्श शिवरायांचा!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये
आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान: 50 कोटी मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने : 250 कोटी रुपये शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन : 300 कोटी रुपये
अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित
1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी
2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास
3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा
5) पर्यावरणपूरक विकास शेती
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता 12,000 रुपयांचा सन्माननिधी
प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार
1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा
आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्यांकडून आता शेतकर्यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार हप्ता शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महाकृषिविकास अभियान
राज्यातील शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार
पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना
एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार
5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनांचे लाभ
2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना योजनेचे लाभ देणार
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले.
12.84 लाख पात्र शेतकर्यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा.
मागेल त्याला शेततळे’ योजनेचा आता व्यापक विस्तार
मागेल त्याला शेततळे योजनेचा आता व्यापक विस्तार
आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर या योजनेवर 1000 कोटी रुपये खर्च करणार
गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना -ही योजना राज्य सरकार राबविणार, त्यामुळे शेतकर्यांचा पूर्ण त्रास वाचणार अपघातग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन
3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार
1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करणार
डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीवाढ 3 वर्षांत 1000 कोटी रुपये निधी
श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरात स्थापन करणार
आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त महाराष्ट्रात ‘श्रीअन्न अभियान’
200 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद सोलापुरात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करणार
नागपुरात कृषी सविधा केंद्र, विदर्भात संत्राप्रक्रिया केंद्र
नागपुरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करणार
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार हा उद्देश या केंद्रासाठी 228 कोटी रुपये देणार
नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यात मोर्शी, बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र /20 कोटी रुपये तरतूद
शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोखीने आर्थिक मदत!
विदर्भ, मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत
अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट आधार बँक खात्यात प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी 1800 रुपये देणार
शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना निवारा-भोजन
कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणार्या शेतकऱ्यांना सुविधा शेतकर्यांच्या मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन जेवणासाठी शिवभोजन थाळीची उपलब्धता
गोसेवा, गोसंवर्धन...
देशी गोवंशाचे संवर्धन, संगोपन, संरक्षणासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करणार
आयोगामार्फत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना, गोमय मूल्यवर्धन योजना राबविणार
देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी भ्रूण बाह्यफलन, प्रत्यारोपण सुविधेत वाढ
विदर्भ-मराठवाड्यातील 11 जिल्ह्यात दुग्ध विकासाच्या दुसर्या टप्प्यासाठी 160 कोटी रुपये
अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय
धनगर समाजाला 1000 कोटी रुपये, महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार
10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार
धनगर समाजासाठी 1000 कोटी रुपये
22 योजनांचे एकत्रिकरण, मंत्रिमंडळ शक्तीप्रदत्त समितीमार्फत अंमलबजावणी
महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार
10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार
अहमदनगर येथे मुख्यालय असणार
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मेंढीपालनासाठी भरीव निधी
शेतकऱ्यांसाठी ट्रान्सफॉर्मर योजना, प्रलंबित कृषीपंपांना वीजजोडण्या
वीज ट्रान्सफॉर्मर नसल्याने पाणी असूनही शेतकर्यांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर योजना
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत हेक्टरी 75,000 रुपये वार्षिक भाडेपट्टा
दिवसा वीजपुरवठ्यासाठी 3 वर्षांत 30 टक्के कृषी वीजवाहिन्यांचे सौर उर्जीकरण, 9.50 लाख शेतकऱ्यांना लाभ
प्रधानमंत्री कुसुम योजनेतून 1.50 लाख सौर कृषीपंप प्रलंबित 86,073 कृषीपंप अर्जदारांना तत्काळ वीजजोडणी उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना वीजदर सवलतीची मुदत आता मार्च 2024 पर्यंत
हर घर जल: जनजीवन मिशनसाठी सुमारे 20,000 कोटी रुपये तरतूद
पाण्यासोबत स्वच्छताही...
जलजीवन मिशन : 17.72 लाख कुटुंबांना नळजोडणी, सुमारे 20,000 कोटी रुपये
1656 एमएलडी क्षमतेचे मलनिस्सारण प्रकल्प
10,000 कि.मी.च्या मलजलवाहिनी
4.55 कोटी मेट्रीक टन कचर्यावर प्रक्रिया
22 नागरी संस्थांना 124 यांत्रिक रस्तासफाई वाहने
ग्रामीण भागात 15,146 घनकचरा, सांडपाणी प्रक्रिया कामे
5000 गावांमध्ये सुरु करणार जलयुक्त शिवार 2.0
जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा 5000 गावांमध्ये गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेस 3 वर्ष मुदतवाढ
लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात
मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात
पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ - जन्मानंतर मुलीला 5000 रुपये पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये अकरावीत 8000 रुपये मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ -
आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये
गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये
अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये
मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये
अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये
अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार
अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली
नवीन महामंडळांची स्थापना भरीव निधी सुद्धा देणार
असंघटित कामगार : महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ
लिंगायत तरुणांना रोजगार : जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ
गुरव समाज : संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ
रामोशी समाज : राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ
वडार समाज : पैलवान कै. मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ
ही महामंडळे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत
प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी देणार .
शहर
- SSC-HSC Result : यंदा दहावी-बारावीचा निकाल लवकर लागणार, शिक्षण मंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली
- Pune : महात्मा गांधी रस्ता परिसरातून १५ लाखांचे मेफेड्रोन जप्त, दोघांना अटक
- Pune : राडारोडा टाकणाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास अधिकाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई !
- Milk Tanker Accident : शिंदवणे घाटात दुधाच्या टँकरचा अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर
महाराष्ट्र
- Chhatrapati Sambhaji Nagar : मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे भुरटे, मृत महिलेच्या अंगावरील सोनं अन् पैसे गायब
- Beed News : बीडमध्ये चाललंय काय? महिला सरपंचाला मागितली एक लाख रुपयांची खंडणी
- Maharashtra Weather : थंडी गायब, हिवाळ्यात निघतोय घाम; पश्चिम महाराष्ट्रात हवामानात बदल, राज्यात कुठे कसं हवामान?
- Ladki Bahin Yojana : अपात्र लाडक्या बहिणींकडून दंडासह पैसे वसूल होणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितले, म्हणाल्या...
गुन्हा
- Pune : मद्यधुंद तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण; मगरपट्टा परिसरातील घटना
- Madhya Pradesh Crime : श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती! विवाहित व्यक्तीकडून लिव्ह-इन पार्टनरची हत्या, ८ महिने मृतदेह फ्रिजमध्ये
- Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार उघड; शाळेतील मुलींचे चेंजिंग रूमध्ये कपडे बदलताना केले व्हिडिओ शूटिंग
- Mumbai : तरुणीचे केस कापले, नंतर बॅगेत भरून घेऊन गेला; दादर स्टेशनवरील धक्कादायक प्रकारानं खळबळ
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- MahaKumbh : महाकुंभात साध्वी की मॉडेल? देखण्या साध्वीची देशभरात चर्चा, व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?
- MahaKumbh 2025 : महाकुंभातलं पहिलं अमृतस्नान; अडीच कोटी भाविकांची संगमावर डुबकी
- Mahakumbh Mela 2025 : संगमावर पहिल्याच दिवशी ४० लाख लोकांचा स्नान सोहळा, संगमात स्नानाचा उत्सव
- Maha Kumbh 2025 : महा कुंभमेळ्यासाठी रेल्वेचे खास नियोजन; रेल्वेसह यात्रेकरुंसाठी विशेष सुविधा