Maharashtra Band : महाराष्ट्र बंदला उस्फुर्त प्रतिसाद; बीड मार्केटमध्ये शुकशुकाट, नांदेडमध्ये कडकडीत बंद

Maharashtra Band : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र व सगेसोयरेचा कायदा लागू करावा यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला प्रतिसाद मिळत असून बीडमध्ये दुकाने बंद असल्याने मार्केटमध्ये शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. तर नांदेडमध्ये  देखील कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. 

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र व सगेसोयरेचा कायदा लागू करावा, यासाठी सकल मराठा समाजाच्या  वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला बीड जिल्ह्यातील सर्व व्यापारी बांधवांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असून बीड शहरामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी आपली बाजारपेठेमधील दुकाने बंद ठेवली आहेत. दरम्यान बीड शहरातील मुख्य मार्केट सुभाष रोडवर दुकाने बंद ठेवल्याने शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, नाकातून रक्तस्त्राव अन् बोलताही येईना; डॉक्टरही चिंतेत

नांदेडमध्ये कडकडीत बंद

नांदेड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील  यांच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. नांदेड शहर आणि अनेक तालुक्यात सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. या बंदच्या पार्श्भूमीवर कुठलही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply