Maharashtra Assembly Winter Session 2022 : विधानसभेत विरोधकांची राजीनाम्याची मागणी होताच कृषीमंत्री अब्दुल सत्तार नॉटरिचेबल; बंगलाही रिकामा

 Maharashtra Assembly Winter Session 2022  : राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर कथित गायरान घोटाळ्याचे आरोप करत राजीनाम्याची मागणी केली. मंत्री अब्दुल सत्तार यांनी वाशीम जिल्ह्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करुन तब्बल 150 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केला. 

मात्र या आरोपांनंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार नॉटरिचेबल असून त्यांच्यांशी संपर्क होत नसल्याची माहिती समोर आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी 150 कोटीचा भूखंड घोटाळा केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केल्याने विधानसभेचे आजचे कामकाज चांगलेच गाजले. यावेळी विरोधकांनी सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्याविरुद्ध घोषणाही दिल्या. यावेळी अजित पवार यांनी ते ज्या वेळेस महसूल राज्यमंत्री होते, तेव्हा मौजे गोडबाभूळ (ता. जि. वाशीम) येथील गट नंबर 44 मधील 37 एकर 19 गुंठे सरकारी गायरान जमिनीचा हा दीडशे कोटींचा घोटाळा केला आहे असा आरोप केला.

मात्र विधानसभेत हा सगळा गोंधळ सुरू असतानाच कृषीमंत्री अब्दुल सत्तार नॉटरिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा बंगलाही रिकामा असून कोणताही संपर्क होत नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान, कृषीमंत्री अब्दुल सत्तार पंजाबराव कृषी विद्यापिठाच्या गेस्ट हाऊसमध्ये असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांनी कोणालाही भेटण्यास नकार देत शासकीय निवासस्थानी न जाता गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम ठोकला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply